प्रमोद वायंगणकरांबाबतचा सस्पेन्स संपला ; शिवसेनेचे दावे “फोल”

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकी दरम्यान कणकवली तालुक्यातील तरळे गावामधील जिल्हा बँकेचे मतदार प्रमोद महिपती वायंगणकर गायब झाल्यामुळे निर्माण झालेला सस्पेन्स निवळला आहे. कर्जाचा बोजा असल्याने त्या तणावाखाली मी घरातून स्वतःहून निघून गेलो होतो. आपणाला कुणीही गायब केले नव्हते. माझा जिल्हा बँक निवडणुकीसंदर्भात काही संबंध नसल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले.

जिल्हा बँकेच्या निवडणूकीच्या धामधुमीत १९ डिसेंबर पासून बँकेचे मतदार प्रमोद वायंगणकर हे अचानक बेपत्ता झाल्याने ते बेपत्ता होण्यामागे भाजपचा हात असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला होता. याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार देखील करण्यात आली होती. मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर देखील प्रमोद वायंगणकर न मिळाल्याने त्यांच्याबाबत सस्पेन्स वाढला होता. मात्र सोमवारी ३ जानेवारी रोजी ते स्वतःहून कणकवली पोलीस ठाण्यात हजर झाले. आपणाला कुणीही गायब केले नव्हते. माझा जिल्हा बँक निवडणुकीसंदर्भात काही संबंध नसल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले आहे. त्यामुळे प्रमोद वायंगणकर बेपत्ता प्रकरणी शिवसेनेचे दावे फोल ठरले आहेत.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!