भाजपला धक्का : माजी उपसभापतींच्या गावात सोसायटी निवडणूकीत पक्षाच्या पॅनेलला “भोपळा”

त्रिंबक ग्रुप विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेवर शिवसेना पुरस्कृत शिवशक्ती सहकारी पॅनलचा एकहाती विजय

कुणाल मांजरेकर

मालवण : मालवण पंचायत समितीचे माजी उपसभापती तथा विद्यमान सदस्य अशोक बागवे यांच्या त्रिंबक गावात सोसायटी निवडणुकीत भाजपला जोरदार धक्का बसला आहे. त्रिंबक ग्रुप विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेवर शिवसेना पुरस्कृत शिवशक्ती सहकारी पॅनलने भाजप पुरस्कृत सिद्धीविनायक सहकार पॅनलचा धुव्वा उडवत एकहाती सत्ता स्थापन केली. याठिकाणी भाजपला भोपळाही फोडता आला नाही. येथील सर्वच्या सर्व १३ ही जागांवर शिवसेनेच्या पॅनलने विजय मिळविला आहे.

स्थानिक शिवसेना नेते समीर हडकर यांच्या नेतृत्वाखाली लढल्या गेलेल्या या निवडणुकीत शिवशक्ती सहकारी पॅनलने एकहाती सत्ता स्थापन केली आहे. या निवडणूकीत आमदार वैभव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली रघुनाथ घाडी, विभाग प्रमुख समीर लब्दे, संतोष तेली, श्रीकांत बागवे, संतोष गोरवले, एकनाथ चिंचवलकर, राजू हिर्लेकर, बाळू बाणे, अशोक वाळवे, अनिल गांवकर, शंकर गांवकर यांच्या सहकार्याने भाजप पुरस्कृत पॅनलचा धुव्वा उडवण्यात आल्याचे समीर हडकर यांनी सांगितले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!