माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयींच्या जयंतीनिमित्त ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार

भाजपा किसान मोर्चाच्या वतीने मालवणात उपक्रम

कुणाल मांजरेकर

मालवण : माजी पंतप्रधान कै. अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त भाजपा किसान मोर्चाच्या वतीने मालवणात ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, किसान मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष किशोर नरे, तालुकाध्यक्ष महेश सारंग, तालुका सरचिटणीस हरिभाऊ केळुसकर, तालुका उपाध्यक्ष जयवंत परब, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष आबा हडकर, गणपत पवार, मालवण शक्ती केंद्र प्रमुख पंकज पेडणेकर, बाळू मालवणकर, किसान मोर्चा चिटणीस प्रकाश राणे, ज्ञानेश्वर परब, बाबू शिंदे, राजू बिडये, हरेश फणसेकर आदी उपस्थित होते. यावेळी जयवंत परब- हेदुळ, गणपत पवार – खोटले, हरिभाऊ केळुसकर – मालवण, आबा हडकर -मालवण आणि प्रकाश राणे – वायंगवडे यांचा किसान मोर्चाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!