मालवण पं. स. चा आदर्श : अभिसरण मधून गोळवणमध्ये उभी राहिली शाळेची संरक्षक भिंत !

अभिसरण मधून नाविन्यपूर्ण काम करणारी मालवण जिल्ह्यातील पहिली पंचायत समिती

कुणाल मांजरेकर

मालवण : नाविन्यपूर्ण कामासाठी प्रसिद्ध असलेल्या मालवण पंचायत समितीने नरेगा अंतर्गत उपलब्ध झालेल्या निधीतून अभिसरण मधून गोळवण शाळा नं. १ च्या संरक्षक भिंतीचे काम पूर्ण केले आहे. अभिसरण मधून यापूर्वी फळबाग लागवड, रस्त्याचे खडीकरण अशी कामे घेण्यात येत होती. मात्र मालवण पं. स. ने प्रथमच प्रशालेच्या संरक्षक भिंती उभ्या करण्याचे नाविन्यपूर्ण काम करुन दाखविले आहे. अशाप्रकारे काम करणारी मालवण पंचायत समिती जिल्ह्यातील पहिली पंचायत समिती ठरली आहे, याबाबतची माहिती सभापती अजिंक्य पाताडे आणि उपसभापती राजू परूळेकर यांनी दिली.

नरेगा योजनेअंतर्गत उपलब्ध असलेल्या निधीतून एमआरजीएस आणि स्थानिक स्तरावरील फंड वापरून अभिसरणचे काम पूर्ण करण्यात आले आहे. मालवण तालुक्यात गोळवणमध्ये एमआरजीएस आणि ग्रामनिधी खर्च करून शाळा नं. १ च्या संरक्षक भिंतीचे काम हाती घेण्यात आले होते. या कामाचे भूमिपूजन जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. सरपंच सुभाष लाड आणि ग्रामपंचायतीच्या सहयोगातून सदरील काम पूर्ण झाले आहे. मालवण तालुक्यात अभिसरण मधून आणखी पाच कामे अशाच प्रकारे हाती घेण्यात आली आहेत. पंचायत समिती आपल्या दारी या अभियानावेळी हे काम सुचविण्यात आले होते. मार्चअखेरपर्यंत एमआरजीएसचा शंभर टक्के निधी नाविन्यपूर्ण कामासाठी खर्च केला जाईल, अशी माहिती सभापती अजिंक्य पाताडे आणि उपसभापती राजू परूळेकर यांनी दिली.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!