उत्तम फोंडेकर यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते होणार सन्मान

आ. वैभव नाईक यांची ग्वाही : फोंडेकर यांचा नाईकांनी केला सत्कार

कुणाल मांजरेकर

मालवण : राज्यात सलग तिसऱ्यांदा सर्वांत प्रथम हापूस आंबापेटी पुण्यात पाठविल्याबद्दल उत्तम फोंडेकर आणि आबा फोंडेकर यांचा आ. वैभव नाईक यांनी शाल, श्रीफळ आणि सन्मानपत्र देऊन सत्कार केला. दरम्यान, फोंडेकर यांच्या आंबा व्यवसायातील उत्तुंग भरारीची दखल घेऊज त्यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते जाहीर सत्कार आयोजित केला जाईल, असेही आ. नाईक यांनी सांगितले.

हापूस आंबा पिकाच्या बाबतीत उत्तम फोंडेकर यांनी मालवणचे नाव जिल्ह्यात अग्रस्थानी आणले याचा आम्हाला गर्व असल्याचे आ. वैभव नाईक म्हणाले. श्री. फोंडेकर यांच्या कडून त्यांनी हापुस आंब्याची स्थिती जाणून घेतली.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!