सिंधुदुर्ग पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या सांस्कृतिक, कला आघाडी जिल्हाध्यक्षपदी रुपेश नेवगी

मालवण : सिंधुदुर्ग पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या सांस्कृतिक, कला आघाडी जिल्हाध्यक्षपदी रुपेश नेवगी यांची निवड करण्यात आली आहे. महासंघाचे जिल्हाध्यक्ष बाबा मोंडकर यांनी ही माहिती दिली.

सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून शासन स्तरावर घोषित होऊन दोन दशके पेक्षा जास्त काळ लोटून गेला आहे. तरीही जिल्ह्याच्या सांस्कृतिक,कला क्षेत्रामध्ये म्हणावा तसा पर्यटन विकास झाला नाही. महासंघाच्या माध्यमातून सदर क्षेत्रात शाश्वत विकास होऊन पारंपरिक दशावतार, स्थानिक लोककला, स्थानिक नृत्य प्रकार, भजन, जत्रोत्सव वाळूशिल्प, रांगोळी अश्या विविध प्रकारामध्ये स्थानिक कलाकारांना रोजगार निर्मिती व जिल्ह्यातील लोककला, कल्चर देश विदेशात पोचविण्यासाठी महासंघातर्फे विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. तसेच या क्षेत्रात जास्तीत जास्त रोजगार निर्मिती व्हावी यासाठी आवश्यक प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात येणार आहेत. या विषयी हॉटेल सायबा येथे झालेल्या सभेत सांस्कृतिक कला जिल्हाध्यक्ष म्हणून रुपेश नेवगी यांची निवड करण्यात आली. यावेळी महासंघ उपाध्यक्ष कमलेश चव्हाण, मालवण तालुकाध्यक्ष अवि सामंत, शहर अध्यक्ष मंगेश जावकर, महिला मालवण तालुका अध्यक्ष श्रीमती मेघा गावकर, सौ. चारुशीला आचरेकर यांच्यासह अन्य पर्यटन व्यावसायिक उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!