मनसेत खळबळ : तालुकाध्यक्ष विनोद सांडव यांचा राजीनामा !

कुणाल मांजरेकर

मालवण : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आक्रमक चेहरा म्हणून ओळख असलेले मनसेचे मालवण तालुकाप्रमुख विनोद सांडव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यांमुळे राजकिय गोटात खळबळ उडाली आहे. त्यांच्या राजीनाम्याचे कारण गुलदस्त्यात आहे. श्री. सांडव यांनी स्वतः याबाबतची माहिती दिली आहे. यापुढे स्वतःच्या व्यवसायात लक्ष केंद्रित करणार असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, विनोद सांडव आपल्या निर्णयावर ठाम राहतात. की त्यांची नाराजी दूर करण्यात मनसे यशस्वी ठरणार ? याची उत्सुकता लागून राहिली आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!