राष्ट्रीय काँग्रेसच्या ओबीसी सेल सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष पदी बाळू अंधारी
मुंबईतील ओबीसी सेलच्या मेळाव्यात घोषणा ; अन्य पदाधिकाऱ्यांचीही नियुक्ती
मालवण : राष्ट्रीय कॉगेसच्या ओबीसी सेल सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी महेश उर्फ बाळू अंधारी यांची निवड करण्यात आली आहे. मुंबई टिळक भवन येथे काँग्रेसच्या ओबीसी सेलचा मेळावा नुकताच घेण्यात आला. यावेळी ३६ जिल्ह्यांचे अध्यक्ष व इतर पदाधिकारी यांचा पदग्रहण सोहळा संपन्न झाला.
यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी राज्यमंत्री सूनील देशमुख, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी, अखिल भारतीय भंडारी समाज महासंघाचे नेते नवीनचंद्र बांदिवडेकर आदी उपस्थित होते. यावेळी सिंधुदुर्ग काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष म्हणून महेश ऊर्फ बाळु अंधारी, प्रदेश प्रतिनिधी महेश ऊर्फ प्रकाश डीचोलकर, महिला प्रदेश प्रतिनिधी सौ. आमिदी मेस्त्री, हेमंत करंगुटकर, प्रवीण आचरेकर यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी सिंधुदुर्गातील जिल्हा काँग्रेस चे सरचिटणीस महिंद्र सावंत, युवक काँग्रेसच्या पल्लवी तारी, ज्येष्ठ कार्यकर्त्या श्रीमती नीलम करंगुटकर आदींसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, कॉंगेसचे जिल्हा प्रभारी विनायक देशमुख यांनी सिंधुदुर्गात या निवडीची घोषणा केली. आगामी काळात राष्ट्रीय कॉगेस पक्ष मजबूत बनवणार असून पक्षाने माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवणार असल्याची प्रतिक्रिया बाळू अंधारी यांनी व्यक्त केली आहे. महेश उर्फ बाळू अंधारी हे कॉगेसचे जुने कार्यकर्ते असून त्यांच्या निवडीने कॉंगेस कार्यकर्त्यांत चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळा गावडे, विकास सावंत, साईनाथ चव्हाण, विलास गावडे, साक्षी वंजारी, अभय शिरसाट, अॅड. दिलीप नार्वेकर, महेंद्र सांगेलकर, चंद्रशेखर जोशी, अरविंद मोंडकर, इरशाद शेख, विजय प्रभू, दादा परब, समिर वंजारी, विधाता सावंत, राजू मसुरकर, सुगंधा साटम, आनंद पवार, मेघनाद धुरी, स्मिता वागळे, सुंदरवल्ली पडीयाची, राघवेंद्र नार्वेकर, केतनकुमार गावडे आदी उपस्थित होते.