खा. विनायक राऊत यांचा पाठपुरावा : सागरमित्रांच्या थकीत वेतनाचा प्रश्न मार्गी
आ. वैभव नाईक, हरी खोबरेकर यांनी खा. राऊतांकडे मांडली होती व्यथा
कुणाल मांजरेकर
मालवण : सिंधुदुर्गातील सागरमित्रांच्या आठ महिन्यांच्या थकीत वेतनासाठी सुमारे १ कोटी ३ लाख रुपयांचे अनुदान खासदार विनायक राऊत यांच्या प्रयत्नांतून मंजूर झाले आहे. सागरमित्रांच्या थकीत वेतनाचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी खासदार राऊत यांचे आभार मानले आहेत.
जिल्ह्याच्या किनारपट्टी भागातील सागरमित्रांचे आठ महिन्याचे वेतन थकले होते. याबाबत आमदार वैभव नाईक, जिल्हा परिषद सदस्य तथा तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, गटनेते नागेंद्र परब यांनी सागर मित्रांची व्यथा खासदार विनायक राऊत यांच्याकडे मांडली. थकीत वेतनामुळे सागरमित्रांचे हाल झाले होते. या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष पुरवित खासदार राऊत यांनी मत्स्यव्यवसाय विभागाच्या आयुक्तांशी चर्चा करत हा प्रश्न मार्गी लावला. त्यामुळे लवकरच सर्व सागरमित्रांना त्यांचे वेतन मिळणार आहे.