भाजप कडून समीर नलवडेंवर नवीन जबाबदारी !

देवगड : कणकवली नगरपंचायतीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यावर भाजपने नवीन जबाबदारी सोपवली आहे. देवगड जामसंडे नगरपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक सुरू झाली असून भाजपाच्या वतीने निवडणूक निरिक्षक म्हणून समीर नलावडे यांची नेमणूक करण्यात आली आहे

समीर नलावडे हे कणकवली नगरपंचायतचे नगराध्यक्ष आहेत. देवगड जामसंडे नगर पंचायतीची निवडणूक २१ डिसेंबर रोजी पार पडत असून २२ डिसेंबरला मतमोजणी होत आहे. निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून भाजपाच्या वतीने समीर नलावडे यांना निरीक्षक पदी नेमणूक केल्याची माहिती भाजपा नेते व कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांनी दिली आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!