मालवण तालुका महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी ममता तळगावकर

मालवण : मालवण तालुका महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी ममता तळगावकर यांची निवड करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा साक्षी वंजारी यांनी प्रदेश सरचिटणीस तथा जिल्हा प्रभारी विनायकराव देशमुख यांच्या उपस्थितीत मालवण येथील तालुका काँग्रेस पदाधिकारी बैठकीत ही निवड जाहीर केली.

महिला अध्यक्षपदासाठी तळगावकर यांची नेमणूक करताना मेघनाद धुरी यांनी सूचक म्हणून तर अरविंद मोंडकर यांनी अनुमोदन देत सर्वानुमते ही निवड करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष बाळा गावडे, माजी जिल्हाध्यक्ष विकास सावंत, प्रांतिक सदस्य साईनाथ चव्हाण, दादा परब, इर्शाद शेख, अरविंद मोंडकर, महिंद्र सावंत, नागेश मौरये, तालुकाध्यक्ष मेघनाद धुरी, श्रीकृष्ण तळवडेकर, बाळू अंधारी, संदेश कोयंडे, देवानंद लुडबे, चंदन पांगे, हेमंत माळकर, योगेश्वर कुरले, गणेश पाडगावकर, अमृत राऊळ, पल्लवी तारी, सरदार ताजर, महेंद्र मांजरेकर, मेघश्याम लुडबे, समीर वंजारी व अन्य पदाधिकारी कार्यकर्ते बहूसंख्येने उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!