आ. वैभव नाईकांची कुडाळ येथे एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनस्थळी भेट

कुडाळ : एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी एसटी कामगारांनी राज्यभर आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी शुक्रवारी कुडाळ एसटी आगारास भेट देऊन आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांशी चर्चा केली.

यावेळी कर्मचाऱ्यांनी आपल्या व्यथा त्यांच्यासमोर मांडल्या. आ. वैभव नाईक यांनी कर्मचाऱ्यांच्या समस्या, अडचणी जाणून घेतल्या. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, परिवहन मंत्री अनिल परब, अर्थमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन थांबविण्याबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, उपजिल्हा प्रमुख अमरसेन सावंत, शहर प्रमुख संतोष शिरसाट, सचिन काळप, राजू गवंडे आदी शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!