शिवसेना प्रणित सिंधुदुर्ग जिल्हा वाळू संघटना अध्यक्षपदी बबन शिंदे

उपाध्यक्षपदी सुशिल चिंदरकर आणि गणेश तोंडवळकर यांची निवड

कुडाळ: शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा प्रणित वाळू संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष पदी शिवसेना उपजिल्हा प्रमुख बबन शिंदे यांची निवड करण्यात आली असून उपाध्यक्ष म्हणून कुडाळ येथील शिवसेनेचे युवा नेते सुशिल चिंदरकर आणि तोंडवळी येथील गणेश तोंडवळकर यांची निवड करण्यात आली आहे. आमदार वैभव नाईक आणि शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे.

संघटनेचे प्रमुख मार्गदर्शक आणि शिवसेना ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष रुपेश पावसकर यांनी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी नगरसेवक सचिन काळप, युवासेनेचे चेतन पडते, सचिव सदा पाटील, खजिनदार आबा खोत, शिवसेना आडवली विभागप्रमुख समीर लब्दे, बाळा पावसकर, महादेव पावसकर, अमोल वस्त, आशिष मयेकर, कवठी सरपंच रूपेश वाडयेकर, मंगेश बांदेकर, एकनाथ बांदेकर, राजन खोबरेकर, निलेश खोत, नरेंद्र धुरी, पराग खोत, स्वप्निल मिठबावकर, संतोष पाटील, बंड्या खोत, मंदार खडपकर, सुनील माळकर, संजय कांबळी, श्रीपाद तेली, अविनाश बळी आदी वाळू व्यावसायिक उपस्थित होते.

बबन शिंदे, जिल्हाध्यक्ष
सुशील चिंदरकर, उपाध्यक्ष
गणेश तोंडवळकर, उपाध्यक्ष

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!