कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मालवण नगरपालिकेचा शहर वासीयांना “दुहेरी दिलासा” !

नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांची माहिती

कुणाल मांजरेकर

मालवण : मागील दोन वर्षांपासून कोरोनाचे संकट कायम आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक, व्यापारी यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले असून या पार्श्वभूमीवर मालवण नगरपालिकेने शहरवासीयांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. यावर्षी मालमत्ता करात न करण्याचा निर्णय नगरपालिकेने घेतल्याची माहिती नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

नगरपालिकेच्या उत्पन्न वाढीच्या दृष्टिने मालवण न. प. अधिनियमातील तरतूदी प्रमाणे चार वर्षातून एकदा न. प. हद्दीतील सर्व मालमत्तांच्या मालमत्ता करामध्ये वाढ करण्याची तरतुद आहे. त्यानुसार सन २०२०-२१ मधे अश्या प्रकारे करवाढ प्रस्तावित होती. परंतु मागील दोन वर्षापासून कोरोनाच्या संकटामुळे जगजीवन विस्कळीत झाले आहे. या महामारीची झळ समाजातील प्रत्येक घटकाला बसली आहे. व्यापारी वर्गाचे अतोनात नुकसान झाले आहे. यामुळे यावर्षी कोणतीही करवाढ न करण्याचा निर्णय न. प. सभेमध्ये घेण्यात आला आहे. यावर्षी पाणी पट्टीमधेही कुठल्याही प्रकारची वाढ न करण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे. त्या पाठोपाठ करवाढ न करण्याचा निर्णय घेऊन मालवण वासियाना थोडाफार दिलासा देण्याचा प्रयत्न नगरपालिकेने केल्याची माहिती नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी दिली आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!