मंदार ओरसकर यांची युवासेना मालवण शहर प्रमुखपदी नियुक्ती ; तर सिद्धेश मांजरेकर शाखा अध्यक्ष
मालवण : येथील युवा कार्यकर्ते मंदार ओरसकर यांची मालवण शहर युवासेना प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग युवासेना प्रमुख मंदार शिरसाट यांनी मालवण शिवसेना शाखा येथे ही नियुक्ती जाहीर केली. दरम्यान रेवतळे युवासेना शाखा अध्यक्षपदी सिद्धेश उमेश मांजरेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मालवण शिवसेना शाखा कार्यालय येथे युवा सेना पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी सिंधुदुर्ग युवासेना प्रमुख मंदार शिरसाट, युवासेना तालुकाप्रमुख मंदार गावडे, उपतालुकाप्रमुख अमित भोगले, तपस्वी मयेकर यासह अन्य युवासेना पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, शिवसेना उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, बांधकाम सभापती मंदार केणी, चंदू खोबरेकर, आतू फर्नांडिस, अनंत पाटकर यासह अन्य उपस्थित पदाधिकारी यांनी मंदार ओरसकर व सिद्धेश मांजरेकर यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.
शालेय जीवनात आदर्श विद्यार्थी, राष्ट्रीय स्तरावरील कब्बडी खेळाडू, पुणे येथील ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल इंजिनिअरिंग कॉलेज जीवनात स्पोर्ट्स जनरल सेक्रेटरी अश्या जबाबदारी यशस्वी पार पाडत मंदार यांनी बॅचलर ऑफ इंजिनियरिंग सिव्हिल व त्यानंतर पोष्ट ग्रॅज्युएशन इन ऍडव्हान्स कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट अभ्यासक्रम पूर्ण केले. एक हुशार, अभ्यासु व उच्चशिक्षित व्यक्तिमत्त्व व राष्ट्रीय स्तरावरील कबड्डी खेळाडू अशी मंदार यांची ओळख आहे. आमदार वैभव नाईक यांच्या कार्याने प्रेरित होऊन मंदार ओरसकर हे गेली काही वर्षे शिवसेनेशी जोडलेले होते. मंदार यांच्यातील नेतृत्वगुण पाहता युवासेना मालवण शहरप्रमुख पदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.