कांदळगाव रामेश्वर मंदिरात श्री रामनवमी निमित्त ६ एप्रिलपर्यंत विविध कार्यक्रम


मालवण : श्री देव रामेश्वर देवस्थान परिसर देवालये विश्वस्थ मंडळ, कांदळगाव यांच्यावतीने कांदळगाव येथील श्री देव रामेश्वर मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे रविवार दि. ३० मार्च गुढीपाडव्यापासून ते रविवार ६ एप्रिल पर्यंत रामनवमी उत्सव साजरा होणार आहे.
त्यानिमित्त गुढीपाडव्या पासून नऊ दिवस रोज रात्रौ पुराणवाचन, पालखी प्रदक्षिणा व किर्तन होणार आहे. तर रविवार दि. ६ एप्रिल रोजी रामनवमी साजरी केली जाणार आहे. सकाळी ११.०० वा. रामजन्म ह्यावर किर्तन, दुपारी १२.३५ वा. रामजन्म त्यानंतर पालखी प्रदक्षिणा, दुपारी १.०० वा. महाप्रसाद, रात्रौ ९.३० वा. पुराण वाचन, पोथीपुजन, पालखी प्रदक्षिणा, कावले मित्रमंडळ हडी यांचा मर्दानी खेळ, किर्तन व त्यानंतर न्हिवे वाडी यांचे नाट्य पुष्प होणार आहे. सोमवार दि. ७ एप्रिल रोजी सकाळी ७.३० वा. लळीतोत्सवाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे. तरी भाविकांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन राणे, परब मानकरी, कांदळगाव ग्रामस्थ आणि श्री देव रामेश्वर व परिसर देवालये विश्वस्थ मंडळ कांदळगाव यांनी केले आहे.


