खा.नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत जिल्हा बँकेची ‘बलसिंधु दत्तक योजना’

जिल्ह्यातील ५२ कुपोषित बालकांसाठी बँक राबवते ही योजना बँकेकडून वार्षिक ३ लाखाची तरतूद:मनीष दळवी

मालवण प्रतिनिधी:

माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या दि.१०एप्रिल २०२५ रोजी वाढदिवसाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्हा बँकेमार्फत अति तीव्र कुपोषित वर्गवारीतील ५२ बालके एक वर्षासाठी “बलसिंधू दत्तक योजने” अंतर्गत दत्तक घेण्याचे नियोजन केले आहे. यासाठी सुमारे वार्षिक रु.३ लाख पर्यंत तरतूद बँकेकडून करण्यात येत आहे. बँकेच्या कार्यक्षेत्रात असणाऱ्या कुपोषित बालकांसाठी बँकेच्या कर्मचारी वर्गाकडून आवश्यक सहकार्य उपलब्ध करून देणार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी प्रसिध्दीपत्रका द्वारे दिली. कुपोषण ही सद्यस्थितीत जागतिक समस्या बनली आहे. वाढ खुंटणे रोगप्रतिकारक शक्ती कमी असणे व गंभीर आरोग्य समस्या अशी कुपोषणाची व्याख्या केली जाते उंचीच्या तुलनेत कमी वजन असणे हे कुपोषणाचे प्रमुख लक्षण आहे. संयुक्त राष्ट्राच्या शाश्वत विकास ध्येय २ मध्ये २०३०पर्यंत सर्व प्रकारचे कुपोषण संपवण्याचे उद्दिष्ट आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत कुपोषित बालकांचे प्रमाण कमी असले तरी काही भागांमध्ये अद्यापही कुपोषित बालके असल्याचे दिसून येते. जिल्ह्यामध्ये सध्यस्थितीत अति तीव्र कुपोषित ५२ व मध्यम तीव्र कुपोषित ६७४ बालके आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँक नेहमीच जिल्हा वाशियांच्या विकासासाठी कटिबद्ध राहिली आहे.बँकेने सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून वेगवेगळे समाज उपयोगी उपक्रम राबवले आहेत.याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील कुपोषित मुलांसाठी दि.१० एप्रिल २०२५रोजी माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायणर राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँके मार्फत अति तीव्र कुपोषित वर्गातील ५२ बालके एक वर्षासाठी “बलसिंधु दत्तक योजने” अंतर्गत दत्तक घेण्याचे नियोजित नियोजन केले आहे. जिल्ह्यातील ४ वैद्यकीय अधिकारी डॉ.दत्तात्रय सावंत- सावंतवाडी,डॉ. सुशांत कुलकर्णी-कुडाळ ,डॉ. हरीश पुरूळेकर-मालवण, व डॉ. नितीन शेटये-कणकवली तसेच भगीरथ प्रतिष्ठान व आशा सेविका,अंगणवाडी सेविका यांचे सहकार्यातून कुपोषित बालकांचे आरोग्य तपासणी वैद्यकीय सुविधा, न्युट्रीशनसाठी प्रोटीन ड्रायफ्रुटस उपलब्ध करून दिले जाणार आहेत. वर्षातून तीन वेळा दर चार महिन्यांनी या मुलांची बॅंके मार्फत आरोग्य तपासणी केली जाणार असून यासाठी वार्षिक सुमारे रुपये ३ लाख पर्यंत ची तरतूद बँकेकडून करण्यात येत आहे बँकेच्या कार्यक्षेत्रात असणाऱ्या कुपोषित बालकांसाठी बँकेच्या कर्मचारी वर्गाकडून आवश्यक सहकार्य उपलब्ध करून देणार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी दिली.बँकेच्या प्रयत्नातून जिल्हा कुपोषण मुक्त होण्यास मदत होणार असल्याचे प्रतिपादन यावेळी त्यांनी केले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 4258

Leave a Reply

error: Content is protected !!