शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते श्रावण ग्राम महसूल कार्यालयाचे उद्घाटन

मालवण : श्रावण ग्राममहसूल अधिकारी कार्यालय नव्या इमारतीचे उदघाटन झाले. नवी वास्तू दिमाखात उभी राहिली आहे. कार्यक्षम व कार्यतत्पर आमदार निलेश राणे हे मोठया प्रमाणात विकासनिधी आणत आहेत. त्याच्या माध्यमातून मालवण तहसीलदार कार्यालय नवीन इमारत प्रश्न ही लवकरच मार्गी लागेल. असे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी श्रावण येथे बोलताना केले.

श्रावण ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी दत्ता सामंत बोलत होते. यावेळी प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुशे, मालवण तहसिलदार वर्षा झालटे, यावेळी सरपंच नम्रता मुद्राळे, उपसरपंच दुलाजी परब, बाळु कुबल, प्रशांत परब, माजी नगरसेवक दिपक पाटकर, माजी उपसभापती राजु परुळेकर, मठ उपसरपंच विनायक बाईत, श्रावण शाळा मुख्याद्यापक विनायक हरकुळकर, बुधवळे, आडवली, मठबुद्रुकचे सरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते. माजी सरपंच प्रशांत परब यांच्या कार्यकाळात त्यांनी या इमारतीसाठी निलेश राणे यांच्या माध्यमातून शासनस्तरावर यशस्वी पाठपुरावा केला. त्यातून ही दिमाखदार वास्तू उभी राहिली.

दत्ता सामंत पुढे म्हणाले, महायुती सरकार जनतेचे सरकार आहे. याठिकाणी खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून गतिमान विकास होत आहे. होत राहील. सोबतच प्रशासनही चांगले काम करत आहे. कुडाळ प्रांताधिकारी व मालवणच्या तहसीलदार वर्षा झालटे दोन्ही अधिकारी जबाबदारपुर्वक जनतेसाठी सेवा देत आहेत. याचं बरोबर श्रावणचे सुपुत्र आचरा मंडळ अधिकारी अजय परब हे ही तत्पर सेवा देत आहेत. एकूणच महसूल विभागातील अधिकारी कर्मचारी यांचे काम चांगले असल्याचे सांगत सर्वांचे कौतुक सामंत यांनी केले.

तहसीलदार वर्षा झालटे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तर प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुशे यांनीही विचार मांडले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विनायक हरकुळकर यांनी केले. तर आभार कोळंब मंडळ अधिकारी मिनल चव्हाण यांनी मानले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 4223

Leave a Reply

error: Content is protected !!