मालवण बाजारपेठे शहरात गांजा ओढल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

मालवण प्रतिनिधी
शहरातील बाजारपेठ येथे गांजा ओढल्याप्रकरणी दोघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई ६ एप्रिल रोजी रात्री उशिरा करण्यात आली.
यात संशयित आरोपी म्हणून चिराग हरीश गावकर (वय -२१) रा. वायरी मालवण आणि युवराज शैलेंद्र चिंदरकर (वय- २३) रा. चिवला बिच मालवण या दोघांना ताब्यात घेतले. याप्रकरणी गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम कलम ८ (क),२७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याची तक्रार पोलीस कर्मचारी महादेव घागरे यांनी दिली आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक प्रविण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश माने, पोलीस उपनिरीक्षक संदीप खाडे, आनंदा यशवंते, पोलिस अंमलदार महादेव घागरे, शिल्पा धामापूरकर यांनी केली.
अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक गणेश माने हे करीत आहेत.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 4195

Leave a Reply

error: Content is protected !!