वायरी भूतनाथ रेवंडकरवाडीत १२ एप्रिल रोजी हनुमान जन्मोत्सव सोहळा


मालवण : मालवण तालुक्यातील वायरी भूतनाथ रेवंडकरवाडी येथील श्री निळकंठ म्हसकर यांच्या प्रांगणातील दक्षिणाभिमुख मारुतीरायाच्या मंदिरात शनिवार दि. १२ एप्रिल रोजी हनुमान जन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
यानिमित्त पहाटे ५ वा. किर्तन – बुवा. प्रभुदास आजगांवकर, वायरी-मालवण, सकाळी ६.२२ वा. हनुमान जन्मोत्सव, सकाळी ७ वा. महाआरती, सकाळी १० वा. श्री सत्यनारायण महापूजा. दुपारी १ ते ३ वा. महाप्रसाद. सांयकाळी ४ ते ६ वा. संगीत संध्या प्रायोजक श्री. कृष्णा बापूनाथ गोसावी आणि मित्रमंडळ. सांयकाळी ६ ते ८ वा. संगीत सुमधुर भजने. रात्री ९ वा. दशावतारी महान नटवर्य श्री. तुकाराम गावडे यांचा कलागौरव. रात्री १० वा. हनुमान दशावतार नाट्य मंडळ यांचा महान पौराणिक दशावतार सारथी महासंग्राम असे कार्यक्रम होणार आहेत. तरी या कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन हनुमान जन्मोत्सव मंडळ वायरी रेवंडकरवाडी यांजकडून करण्यात आले आहे.


