घुमडाई मंदिरात रविवारी श्री रामनवमी उत्सवानिमित्त विविध कार्यक्रम


भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष दत्ता सामंत यांचे आवाहन
मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण तालुक्यातील घुमडे गावचे ग्रामदैवत श्री देवी घुमडाई मंदिरात रविवारी ६ एप्रिलला श्री राम नवमी उत्सव आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त सकाळी ८ वा. धार्मिक कार्यक्रम, १०.३० वा. स्थानिकांची भजने, दुपारी १२ वा. रामजन्म, १२.३० वा. पालखी, १ वा. पासून महाप्रसाद तर सायंकाळी ६.३० वा. वालावलकर दशावतार नाट्यमंडळ, वालावल यांचा “गरुड गर्वहरण” हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. तरी या कार्यक्रमांचा भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन घुमडे ग्रामस्थ मंडळाच्या वतीने अध्यक्ष देवदत्त उर्फ दत्ता सामंत व ग्रामस्थांनी केले आहे.

