मालवणी बाजारच्या मिरची महोत्सवाचा शुभारंभ


मालवण प्रतिनिधी :
तालुका शासकीय निमशासकीय कर्मचारी ग्राहक सहकारी संस्था लिमिटेड मालवण संचलित मालवणी बझारचा मिरची महोत्सव शुभारंभ संस्थेचे अध्यक्ष पी. एल. मोहिते, संचालक मंडळ सदस्य, संस्थेचे अधिकारी, कर्मचारी, सभासद, ग्राहक यांच्या उपस्थितीत आज सकाळी झाला.
आजपासून १२ एप्रिल या सहा दिवसांच्या कालावधीमध्ये सकाळी ८.३० ते सायंकाळी ६.३० या वेळेत मिरची महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या मिरची महोत्सवात बॅडगी, रायचूर, काश्मिरी, गुंटुर अशी विविध प्रकारची दर्जेदार मिरची व गरम सामान माफक दरात खरेदी करता येणार असून सर्वांनी या मिरची महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष प्रमोद मोहिते यांनी मालवणी बझार तर्फे केले आहे. यावेळी संस्थेचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, ग्राहक उपस्थित होते.

