वक्फ सुधारणा विधेयक संसदेत बहुमताने मंजूर ; मालवणात जल्लोष !

विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि सकल हिंदू समाजाने व्यक्त केला आनंद

मालवण | प्रतिनिधी : वक्फ सुधारणा विधेयक संसदेत बहुमताने मंजूर झाल्या नंतर मालवणात विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि सकल हिंदू समाज यांच्या वतीने फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. तर जोरदार घोषणाबाजी यावेळी उपस्थितानी केली. यावेळी विलास हडकर यांनी विचार मांडले. राष्ट्रद्रोही शक्तींना लगाम लावणारे हे विधेयक आहे. मोदी सरकारचे अभिनंदन. विधेयकला पाठिंबा दर्शवणाऱ्या सर्वांचे आभारही यावेळी व्यक्त करण्यात आले

यावेळी विलास हडकर यांसह भाऊ सामंत, विजय केनवडेकर, गणेश कुशे, आप्पा लुडबे, दत्तात्रय नेरकर, ललित चव्हाण, शेखर गाड, अवी सामंत, बबन परुळेकर, आबा हडकर, संदीप बोडवे, हरीश पडते, प्रकाश करंगूटकर, गणेश चव्हाण, प्रसाद हळदणकर, स्वप्नील घाडी, मुकुंद घाडी, रजनीष पाल यांसह अन्य उपस्थित होते. 

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 4195

Leave a Reply

error: Content is protected !!