भाजप नेते निलेश राणेंनी केलं अशोक सावंतांचं कौतुक !

अशोक सावंतांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या टीमचा महावितरण, बीएसएनएल प्रश्नी संघर्ष

विनायक राऊतनी वायफळ बडबड करण्यापेक्षा बीएसएनएलचे बंद टॉवर सुरू करावेत

कुणाल मांजरेकर

मालवण : भाजपाचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत यांच्या कार्याचं कौतुक केलं आहे. अशोक सावंत यांच्या नेतृत्वाखाली भाजपाची एक टीम महावितरण आणि बीएसएनएलच्या कारभारावर संघर्ष करत असून ग्राहकांना कोणत्याही प्रकारचा त्रास झाल्यास भाजपाकडून चोख उत्तर असा इशारा निलेश राणे यांनी दिला आहे.

मालवण येथे ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी खासदार विनायक राऊत यांच्यावर निलेश राणे यांनी टीका केली. विनायक राऊत यांनी अनेक ठिकाणी बीएसएनएल टॉवरची उद्घाटने केली. पण हे टॉवर सुरू झालेले नाहीत. एका गावाने तर खासदारांवर ४२० ची फ्रॉडची केस पण टाकली. त्यामुळे विनायक राऊत यांनी वायफळ बोलण्यापेक्षा आपल्या पदाचा वापर करून बीएसएनएल टॉवर सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत. महावितरण आणि बीएसएनएल प्रश्नी अशोक सावंत यांच्या नेतृत्वाखाली भाजपाची एक टीम सतत संघर्ष करत आहे. शिवसेना सत्तेत असूनही त्यांना हे काम कधीच जमले नाही. महावितरणला थकीत वीज बिल प्रश्नी ज्या भाषेत सांगायचे, त्या भाषेत आम्ही सांगितले. यामुळेच ग्राहकांवरील कारवाई थांबली. त्यामुळे त्याचे श्रेय अन्य कोणीही घेऊ शकत नाही. राज्य सरकारसह येथील आमदार, खासदार वीज बिलाचे काही युनिट माफ करणार होते, मात्र ग्राहकांची वीज कनेक्शन कट करेपर्यंत यांची मजल गेली आहे. ग्राहकांना त्रास देण्याचा प्रयत्न केल्यास योग्य ते उत्तर भाजपा मार्फत दिले जाईल. सध्या ग्राहकांना थ्री फेज मीटर मिळत नाही. हा प्रश्न देखील सोडविला जाईल, असे निलेश राणे म्हणाले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!