हडी, मसुरे खोतजुवा येथे उबाठाला धक्का ; दत्ता सामंतांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश 

महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांना मोठे मताधिक्य देण्याचा निर्धार 

मालवण : मालवण तालुक्यात उबाठा गटाला महायुतीचे धक्के सुरूच आहेत. मंगळवारी हडी येथील उबाठा कार्यकर्ते राजेश शेडगे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. तसेच मसुरे खोतजुवा येथील उबाठा गटाचे निलेश खोत यांनीही शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी सर्व प्रवेशकर्ते यांचे स्वागत केले. दरम्यान महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांना मोठे मताधिक्य देण्याचा निर्धार प्रवेशकर्ते यांनी व्यक्त केला. 

यावेळी शिवसेना कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख महेश राणे, सूर्यकांत फणसेकर, छोटू ठाकुर, पराग खोत, सुशील शेडगे, जगदीश चव्हाण, पंढरीनाथ मसुरकर यांसह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी राजेश शेडगे म्हणाले, मागील काही वर्षे गैरसमजातून आपण ठाकरे गटात गेलो. मात्र विकासाची धमक ही राणे साहेबांकडेच आहेत. महायुती सरकारच्या माध्यमातूनच गावाचा गतिमान विकास होऊ शकतो. हे आपण 22 वर्षे राणे साहेब यांच्या सोबत कार्यकर्ता म्हणून काम करताना अनुभवले. मधल्या काळात आपण काही गैरसमजाने बाजूला गेलो मात्र विकासाच्या दृष्टिकोन ठेवून आपण शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे शेडगे यांनी सांगितले. निलेश खोत यांनीही गतिमान गाव विकासाच्या दृष्टिकोनातून शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे सांगितले.

मसुरे खोत जुवा येथील उबाठा कार्यकर्ते निलेश खोत यांसह अथर्व खोत, माजी उपसरपंच अनिल खोत, मयूर खोत, दक्षत खोत, प्रणय खोत, जितेंद्र खोत, संदीप खोत, सुयेश खोत, पंडित खोत, नंददीपक खोत, राज खोत तसेच शरद पवार गटाचे ओबीसी तालुका अध्यक्ष नामदेव गिरकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. तर हडी येथील उबाठा गटाचे कार्यकर्ते तसेच मागील ग्रामपंचायत निवडणुकीतीत सरपंच पदाचे उमेदवार राजेश शेडगे यांसह धीरज शेडगे,आदित्य शेडगे, शिवम तोंडवळकर, जगदीश शेडगे, प्रशांत भिसळे, गौरव तोंडवळकर, तेजस शेडगे, यश आचरेकर, कल्पेश आचरेकर, योगेश शेडगे, ओमकार शेडगे, साहिल भिसळे, अनंत सुभेदार, दीपक पाटकर, प्रकाश तोंडवळकर, रंजित पडवळ, सागर दांडकर, सचिन खोत, प्रियंका तोंडवळकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3835

Leave a Reply

error: Content is protected !!