शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचा धडाका कायम ; मनसेचे विधानसभा सचिव सचिन सावंत यांचा शिवसेनेत प्रवेश
निलेश राणे यांना मोठे मताधिक्य देण्याचा सचिन सावंत यांचा विश्वास ; माणगाव, नानेली, साळगाव, कालेली, येथील कार्यकर्त्यांचाही प्रवेश
कुडाळ : शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचा धडाका कायम असून माणगाव येथील मनसेचे विधानसभा प्रमुख सचिन सावंत यांनी दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांसह दीपक काणेकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी सचिन सावंत यांनी महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांना लोकसभेपेक्षाही मोठे मताधिक्य देणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.
यावेळी हरीश गुंजाळ, प्रसाद भिसे, प्रताप भोई, विकास लाड, दत्तप्रसाद वारंग नानेली, प्रकाश मिस्त्री नानेली, सिताराम परब कालेली, अभिषेक माढेश्वर, सुभाष वासकर, शरद परब कालेली, गणेश सावंत, राजेश सावंत, दिगंबर सावंत, रमेश सावंत, सुभाष सावंत,उमेश सावंत, अमित सावंत, अक्षय सावंत, चेतन नार्वेकर, केदार नार्वेकर, जनार्दन घाडी, नानेली संकेत घाडी नानेली, प्रथमेश ठाकूर साळगाव, प्रसाद ठाकूर साळगाव, साहिल ठाकूर साळगाव, श्री संदेश तामानेकर, गुरु तामानेकर, नवनाथ भोगटे, केदार नार्वेकर, तुकाराम ठाकूर, आर्यन ठाकूर साळगाव, अमोल केसरकर, प्रफुल्ल सावंत, विनायक सावंत, चंद्रशेखर मस्के, नाना गरुड, सौ सेजल सावंत, शुभांगी सावंत, श्रीमती लाड, महिमा हाडगूत,अपूर्वा सावंत, प्रभावती सावंत, रंजना सावंत, लक्ष्मी भोगटे, आशा लाड, उर्मिला रेडकर, गायत्री सावंत, प्रतिभा काणेकर मोहिनी सावंत मनस्वी जाधव, अनिता जाधव, शुभांगी वासकर, श्रावणी परब, अंकिता नार्वेकर, सिद्धी नार्वेकर, चिन्मय भोकटे, जानकी महाडेश्वर, यांनी प्रवेश केला.
यावेळी शिवसेना उपनेते संजय आग्रे, जिल्हा प्रवक्ते रत्नाकर जोशी, उपजिल्हाप्रमुख उपजिल्हाप्रमुख राजा गावडे, प्रीतम गावडे, विश्वास गावकर, तालुकाप्रमुख अरविंद करलकर, सचिन धूरी, महेश भिसे, दीपक कानेकर, दत्ता कोरेगावकर, सचिन परब, नितीन सावंत, प्रसाद नार्वेकर, गणेश पालव, योगेश केरकर, महेश भर्तु, लक्ष्मी केसरकर उपस्थित होते.