विजय उर्फ बाबू कदम यांची शिवसेना आचरा वरचीवाडी शाखाप्रमुखपदी नियुक्ती
तालुकाप्रमुख महेश राणे यांनी केली नियुक्ती जाहीर ; जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान
मालवण : माजी खासदार निलेश राणे यांचे कट्टर समर्थक असलेल्या विजय उर्फ बाबू कदम यांची शिवसेनेच्या आचरा वरचीवाडी शाखाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तालुकाप्रमुख महेश राणे यांनी ही नियुक्ती जाहीर केली असून जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले आहे.
यावेळी उपजिल्हाप्रमुख राजा गावडे, तालुकाप्रमुख महेश राणे, उद्योजक संतोष कोदे, अभय भोसले, सचिन हडकर, दादा साईल, आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस, मंदार लुडबे, चंद्रकांत गोलतकर, बांदिवडे सरपंच आशु मयेकर, बाबू परुळेकर, पंकज आचरेकर, आचरा उपसरपंच संतोष मिराशी, उदय घाडी व इतर मान्यवर उपस्थित होते.