कुंभारमाठ उबाठा गटाचे माजी सरपंच प्रमोद भोगावकर कार्यकर्त्यांसह शिवसेनेत दाखल !
कुंभारमाठ शिवसेना शाखाप्रमुखपदी नियुक्ती ; जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी दिले नियुक्तीपत्र
मालवण : कुंभारमाठ गावातील उबाठा शिवसेनेचे माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य प्रमोद भोगावकर आणि कार्यकर्त्यांनी आज शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. प्रवेशकर्त्यांमध्ये यश भोगावकर, समर्थ मिठबावकर, उपशाखाप्रमुख नंदू घोगळे, नवनीत मिठबावकर यांचा समावेश आहे. प्रमोद भोगावकर यांची शिवसेना शाखाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजा गावडे, कुंभारमाठ सरपंच पूनम वाटेगावकर, भाजपाचे बूथ अध्यक्ष दिलीप सागवेकर, राजेश डिचवलकर, माजी उपसभापती मधुकर चव्हाण, मनोज वाटेगावकर, माजी उपसरपंच बाळा माने, सुधीर वस्त, मंदार लुडबे, रवींद्र टेंबूलकर आदी उपस्थित होते.