शिवसेनेचं सीमोल्लंघन ; मालवणात जल्लोष !

दादरानगर हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेचा ऐतिहासिक विजय

कुणाल मांजरेकर

मालवण : प्रादेशिक पक्ष असलेल्या शिवसेनेने दादरानगर हवेली लोकसभेच्या पोटनिवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. या निमित्ताने मालवण शिवसेनेच्या वतीने फटाके वाजवून आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

दादरा नगर हवेली पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार कलाबेन डेलकर यांनी भाजपचे उमेदवार महेश गावित यांचा ५१ हजार मताधिक्याने पराभव केला आहे. त्यानंतर मालवण शिवसेना शाखा कार्यालयासमोर फटाक्यांची आतिषबाजी करत विजयी घोषणा देण्यात आल्या. यावेळी उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, बांधकाम सभापती मंदार केणी, महिला तालुका संघटक पूनम चव्हाण, उपशहरप्रमुख बाळू नाटेकर, किरण वाळके, यशवंत गावकर, अरविंद मराळ, उमेश मांजरेकर, प्रसाद आडवणकर, प्रशांत भोजने, आतु फर्नांडिस आदी उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!