“अब दिल्ली अब दूर नही” … पालकमंत्री उदय सामंत यांचे ट्विट

दादरा नगर हवेली विजयानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांचेही केले अभिनंदन

कुणाल मांजरेकर

दादर नगर हवेली लोकसभा मतदार संघाच्या पोटनिवडणूकीतील शिवसेना उमेदवार कलाबेन डेलकर यांच्या विजयाने शिवसेनेने महाराष्ट्राच्या बाहेर पहिला विजय मिळवला आहे. या विजयानंतर राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे अभिनंदन केले आहे. अब दिल्ली दूर नही, असं ट्विट पालकमंत्र्यांनी केलं आहे.

शिवसेना हा प्रादेशिक पक्ष म्हणून ओळखला जातो. शिवसेनेने नेहमी महाराष्ट्रा बाहेर आपले हात पाय पसरण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रत्येक वेळी शिवसेनेला अपयश आले. मात्र शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हार न मानता राज्या बाहेर हात पाय पसरण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले. दादरा नगर हवेली मतदार संघाचे खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईत येऊन आत्महत्या केली होती. त्यावेळी शिवसेनेने डेलकर कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत त्यांना आधार दिला होता. त्यामुळे डेलकर यांच्या पत्नी श्रीमती कलाबेन डेलकर आणि त्यांच्या मुलाने पोटनिवडणूकी पूर्वी शिवसेनेत प्रवेश करत शिवसेना उमेदवार म्हणून निवडणूक लढवली. या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून श्रीमती डेलकर यांनी येथून विजय मिळवला आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे राजकीय क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!