आ. नितेश राणे मुस्लिम समाजाच्या नव्हे तर देशद्रोहींच्या विरोधात ; रज्जाक बटवाले यांचे परखड मत

राणेंवर टीका करणाऱ्यांनी मुस्लिम समाजांसाठी काय केले याचा लेखाजोखा द्यावा ; आ. राणे विजयाची हॅट्ट्रिक करण्याचा विश्वास

कणकवली : कणकवली, देवगड, वैभववाडी विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आमदार नितेश राणे यांना मुस्लिम समाजाच्या लोकांचा पाठिंबा काल होता. आज आहे आणि उद्याही कायम राहणार आहे. आ. नितेश राणे हे कधीच मुस्लिम समाजाच्या विरोधात नाहीत. ते देशद्रोहींच्या विरोधात बोलतात. आजपर्यंत त्यांनी मुस्लिम समाजाला भरपूर प्रमाणात मदत केली आहे. त्यांची विजयी घोडदौड कोणी रोखू शकत नाही. ते या निवडणुकीत शंभर टक्के विजयाची हॅट्ट्रिक करतील, असा ठाम विश्वास कणकवली अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष रज्जाक बटवाले यांनी व्यक्त केला आहे.

आमदार नितेश राणे यांच्या विरोधात आज जे बोलत आहेत, त्यांनी मुस्लिम समाजाचा फक्त आणि फक्त स्वार्थासाठी उपयोग करून घेतला. आपली पोळी भाजली. मुस्लिम समाजाला पुढे आणण्यासाठी काय केले ते सांगावे. राणे कुटुंबीयाने मुस्लिम समाजातील अनेक लोकांना आर्थिक, शैक्षणिक भरपूर प्रमाणात मदत केली आहे. तुम्ही काय केले ते सांगा असा सवाल यावेळी बटवाले यांनी केला. या मतदार संघाचा विकास दहा वर्षांत नितेश राणे यांनी भरपूर प्रमाणात केला आहे. एवढा विकास निधी एखादा मंत्री सुद्धा आणू शकत नाही. आज प्रत्येक गावात, वाडी मोहल्ला येथे त्यांनी विकास केला आहे. म्हणून लोकांचा ओघ त्यांच्याजवळ आहे. त्यांच्या विरोधात जे बोलत आहेत, त्यांनी पहिले आपले आत्मपरीक्षण करावे. मुंबईत एसीमध्ये बसून विकास होत नाही. त्यासाठी जमिनीवर बसून लोकांची काय समस्या आहे ती समजून घ्यायला हवी. आपल्या गावात आपली काय किंमत आहे, ते लोकांना माहिती आहे. तेव्हा जे कोणी आरोप करत आहेत, त्यांनी येणाऱ्या २३ तारीखला आपले सामान बांधून पुन्हा पाच वर्षासाठी जाण्याचे तिकिट बुकिंग करून ठेवावे. नितेश राणे आपली हॅट्ट्रिक पुर्ण करतील. आम्ही सर्व मतदार राजा देखील त्यावेळी दिपावली साजरी करणार व गुलाल उधळणार असे रज्जाक बटवाले यांनी म्हटले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3813

Leave a Reply

error: Content is protected !!