जनतेला दिलेल्या शब्दाचा मान राखण्यासाठीच निवडणुकीच्या रिंगणात
राष्ट्रवादीच्या बंडखोर अर्चना घारे यांचे स्पष्टीकरण ; उद्यापासून प्रचाराला सुरुवात
सावंतवाडी | सिद्धेश पुरळकर
वरिष्ठांकडून दबाव येऊन सुद्धा मी माझं मन विचलित होऊ न देता, जनतेला दिलेल्या शब्दाचा मान राखून निवडणुकीच्या रिंगणात उतरले असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या बंडखोर नेत्या अपक्ष उमेदवार अर्चना घारे परब यांनी व्यक्त केला आहे. उद्यापासून आपण प्रचाराला सुरुवात करणार असून, जनतेचा मला नक्कीच चांगला पाठिंबा मिळेल असा विश्वास देखील त्यांनी सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे.
यावेळी त्या पुढे बोलताना म्हणाल्या की गेल्या पंधरा वर्षांत हा मतदारसंघ विकासापासून वंचित राहिला असून आता परिवर्तन घडवण्यासाठी मी रणांगणात उतरले आहे. माझ्यावर जनता विश्वास नक्की ठेवेल आणि मला विजयी करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मी कोणावरही नाराज नसून वरिष्ठांनी मला खूप प्रेम दिलं असल्याचे सांगून या निवडणुकीत आपल्याला पाकीट ही निशाणी मिळाली असून त्या समोरील बटण दाबून आपल्याला विजयी करा असे आवाहन देखील त्यांनी केले आहे. यावेळी पुंडलिक दळवी, देवेंद्र टेंबकर, हिदयातुल्ला खान, याकूब शेख , संजय भाईप, विनायक परब, संतोष जोईल, नवल साठेलकर, वृत्त्विक परब, विवेक गवस, अवधूत मराठे, साबाजी रेडकर, निलेश गावडे, नोबर्ट माडतीस, पंढरी राऊळ आदी उपस्थित होते .