शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचा आंबडपालमध्ये उबाठाला धक्का ; माजी सरपंचांसह अनेक कार्यकर्ते शिवसेनेत !

महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांना गावातून मोठे मताधिक्य देण्याची ग्वाही 

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील आंबडपाल गावात शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी ठाकरे शिवसेनेला धक्का दिला आहे. येथील माजी सरपंच प्रवीण सावंत, माजी सरपंचा अस्मिता सावंत यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी दत्ता सामंत यांच्यासह महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. विकास करण्याची क्षमता केवळ शिवसेना – भाजपा महायुतीत असून येत्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांना धनुष्यबाण निशाणीवर मतदान करून मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार प्रवेशकर्त्यांनी व्यक्त केला. तर गावातील विकासाचे प्रश्न महायुती सरकारच्या माध्यमातून निश्चितपणे सोडवले जातील, अशी ग्वाही दत्ता सामंत यांनी दिली

यावेळी माजी सरपंच प्रवीण सावंत, अस्मिता सावंत यांच्यासह प्रज्ञा सावंत, निलेश सावंत, स्वप्नील सावंत, दुर्वांकुर सावंत, दिनकर सावंत, भिकाजी सावंत, मोहन सावंत, स्वर्णिका सावंत, वसंत सावंत, विश्राम सावंत, सूर्यकांत सावंत, अलका सावंत, दीपाली सावंत, नयना गायचोर, लक्ष्मी धुरी, कृष्णा सावंत यांच्यासह अनेकांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेनेचे उपनेते संजय आग्रे, माजी जि. प. अध्यक्षा दीपलक्ष्मी पडते, शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजा गावडे, भाजपा तालुकाध्यक्ष दादा साईल, दीपक नारकर, पप्या तवटे, प्रीतम गावडे, विश्वास गावकर यांच्यासह भाजपा आणि शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3811

Leave a Reply

error: Content is protected !!