देवली गावातील शिवसेना – भाजपा महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ ; निलेश राणे यांना मोठे मताधिक्य देण्याचा निर्धार
भगवती देवी मंदिर येथे श्रीफळ ठेवून प्रचाराचा शुभारंभ : शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची प्रमुख उपस्थिती
मतदार संघातून निलेश राणे यांना मोठे देण्याची द्या, ग्रामस्थांच्या मागणीनुसार गावच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध : दत्ता सामंत यांची ग्वाही
मालवण : शिवसेना भाजपा महायुतीचे कुडाळ मालवण मतदार संघातील उमेदवार निलेश राणे यांच्या देवली गावातील प्रचाराचा शुभारंभ शनिवारी भगवती देवी मंदिर येथे श्रीफळ ठेवून करण्यात आला. निलेश राणे यांच्या मोठया माताधिक्याचे साकडे यावेळी घालण्यात आले. देवली, काळेथर, वाघावणे बुथ 117, 118 अंतर्गत प्रचाराला सुरवात करण्यात आली. गावच्या गतिमान विकासासाठी आमचा पाठिंबा निलेश राणे यांनाच असून गावातून मोठे मताधिक्य निलेश राणे यांना देणार असा निर्धार उपस्थित ग्रामस्थांनी व्यक्त केला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
महायुती सरकार म्हणजे जनतेचे सरकार आहे. जनतेच्या आशीर्वादाने पुन्हा महायुती सरकारच येणार आहे. यां मतदारसंघातून निलेश राणे यांना मोठे मताधिक्य द्या. ग्रामस्थांच्या मागणीनुसार गावाच्या सर्वांगीण विकासासाठी निलेश राणे यांच्या साथीने आम्ही कटीबद्ध आहोत, अशी ग्वाही दत्ता सामंत यांनी यावेळी ग्रामस्थांना दिला.
यावेळी देवबाग विधानसभा प्रभारी दाजी सावजी, शिवदास चव्हाण, माजी सरपंच बाबू चव्हाण, माजी शाखा प्रमुख चंद्रकांत चव्हाण, बूथ कमिटी अध्यक्ष रामचंद्र चव्हाण, बबलू चव्हाण, समीर वेतुरेकर, वैभव चव्हाण, शंभा चव्हाण, महादेव चव्हाण, राजू चव्हाण, विनायक चव्हाण, हेमंत चव्हाण, विरेश मांजरेकर, आपा मांजरेकर, गौरव चव्हाण, वासुदेव चव्हाण, संदेश वेतुरेकर, रुपेश आळवे, विजय देऊलकर, राजा सावंत, दीपेश मांडये, अवदुंबर चव्हाण, युद्धार्जित चव्हाण, निनाद चव्हाण, अक्षय चव्हाण, रमेश मालवणकर, अमित चव्हाण, निखिल चव्हाण, हनुमंत पालव, गणेश चव्हाण, योगश चव्हाण, बंटी चव्हाण, लक्षुमन देऊलकर, राहुल चव्हाण, शैलेश चव्हाण, अजित चव्हाण, महेश नाईक, स्वप्नील देऊलकर, सूर्या चव्हाण, देविदास चव्हाण, हेमंत परब, रोहन मयेकर, समीर वाक्कर, अमित वाक्कर, ऋषीं आचरेकर, बाळा आचरेकर, मनीष पाटकर, ग्राप सदस्य मेघा पाटकर, शामा मेस्त्री, हेमंत चव्हाण, हर्ष चव्हाण, शुभम चव्हाण यांसह देवली काळेथर वाघवणे वाळू संघटना आणि बाबू चव्हाण देवाक काळजी मित्र मंडळ सहकारी ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख विश्वास गांवकर, सोशल मीडिया जिल्हाप्रमुख हर्षद पारकर, युवासेना पदाधिकारी मंदार लुडबे, विभाग प्रमुख कमलाकांत पारकर यांनीही ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता देवली गावातून निलेश राणे यांना मोठे मताधिक्य मिळेलच असा विश्वास व्यक्त केला. ग्रामस्थांच्या मोठया प्रतिसादात घरोघर प्रचार करण्यात आला.