शिंदे शिवसेनेला धक्का : देवबाग सरपंच उल्हास तांडेल यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश
मालवण तालुक्यात शिंदे गटाच्या ताब्यात असलेली एकमेव ग्रामपंचायत आता ठाकरे गटाकडे ; आमदार वैभव नाईक यांच्या कार्यपद्धतीवर प्रेरित होऊन सरपंच, उपसरपंच व ग्रा. पं. सदस्यांचा ठाकरे गटात प्रवेश
मालवण : मालवण तालुक्यातील शिंदे सेनेच्या ताब्यात असलेल्या एकमेव देवबाग ग्रामपंचायतच्या सरपंच उल्हास तांडेल यांसह उपसरपंच तात्या बिलये आणि ग्रा. पं. सदस्य रुपाली मोंडकर, प्रतिक्षा चोपडेकर, दत्तात्रय केळुसकर यांनी शिंदे गटाला सोडचिट्ठी देऊन रमेश कद्रेकर यांच्या माध्यमातून आ. वैभव नाईक व माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या उपस्थितीत शिवसेनेची मशाल हाती घेतली आहे. प्रवेशकर्त्यांचं आमदार वैभव नाईक यांनी शिवबंधन बांधुन पक्षात त्यांच स्वागत केले आहे.
यावेळी बोलताना देवबाग सरपंच उल्हास तांडेल म्हणाले, आपण कुठल्याही पैशाचे आमीष न ठेवता केवळ आणि केवळ आमदार वैभव नाईक यांच्या विकास कार्यप्रणालीला प्रेरित होऊन आपण पक्षप्रवेश केला आहे. मालवण तालुक्यात शिंदे गटाच्या ताब्यात देवबाग ही एकच ग्रामपंचायत होती. तरीदेखील सातत्याने पक्ष नेतृत्वाने गळचेपी करून ताकद देण्याचे कार्यकर्त्यांना काम केले नाही. तसेच कुडाळ मालवणची जागाही शिंदे गटाच्या वाट्याला येऊन देखील त्या ठिकाणी भाजपच्या आयात उमेदवाराला संधी दिल्यामुळेच आपण नाराज होऊन आपण आमदार वैभव नाईक यांचे नेतृत्व स्वीकारला आहे. त्याचप्रमाणे आ. वैभव नाईक यांनी देवबागमध्ये केलेली विकास कामे धुपप्रतिबंधक बंधारे,नळ पाणी योजना,भूमिगत विद्युत वीजवाहिन्या, बीएसएनएल टॉवर,तौक्तेवादळात दिलेली भरीव नुकसान भरपाई, पारंपारिक मच्छीमारांचे प्रश्न सातत्याने मांडुन त्यांना न्याय मिळवून देवुन त्यांनी कोट्यावधी रुपयांची कामे देवबागमध्ये केली आहेत. आ.वैभव नाईक यांच्या पाठीशी राहून त्यांना देवबाग मधून येणाऱ्या निवडणुकीत मी आणि माझे सहकारी मोठ्या मताधिक्य देण्याचा निर्धार करत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी परशुराम उपरकर म्हणाले, देवबागवासियांनी स्वाभिमानी सरपंच तांडेल यांच्या पाठीशी उभे राहून आ.वैभव नाईक यांची मशाल ही निशाणी निवडून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करावे. येणाऱ्या काळात आपण तिसऱ्यांदा त्यांना विधानसभेत निवडून देऊन आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री करूया असे उपरकर म्हणाले. आमदार वैभव नाईक म्हणाले, माझ्यावर व माझ्या पक्षावर जो विश्वास येथील सरपंच, उपसरपंच, ग्रा. सदस्य व कार्यकर्त्यांनी दाखवला त्या बद्दल विशेष ऋण व्यक्त करत देवबाग सरपंच उल्हास तांडेल यांचे मनापासून मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात स्वागत करतो. मी व माझे सहकारी त्यांचा मानसन्मान या पुढील काळात देखील राखून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, खरंतर उल्हास तांडेल हे तळागाळातून आलेले कार्यकर्ते आहेत सत्ता असली आणि सत्ता नसली तरी ते लोकांचे प्रश्न सोडवतात म्हणूनच ते एवढ्या मोठ्या ग्रामपंचायतीचे सरपंच आहेत. उल्हास तांडेल यांनी कुठलीही अपेक्षा न ठेवता आम्ही केलेला विकास पाहून त्यांनी पक्ष प्रवेश केला आहे.यापुढील काळात देखील आपण देवबाग चा विकास करण्यासाठी कटिबद्ध आहोत तसेच विकास कामांना निधी कमी पडू दिला जाणार नाही असे ते म्हणाले.
यावेळी सरपंच उल्हास तांडेल, उपसरपंच तात्या बिलये, ग्रामपंचायत सदस्य रूपा मोंडकर,दत्तात्रय केळुसकर,प्रतीक्षा चोपडेकर,नाना तांडेल,एन्जॉय तुळसकर,रुपेश लोंढे,उत्तम केळुस्कर शेखर कांदळगावकर,गणेश सातोसकर,कीर्तिवान केळुसकर, दशरथ राऊळ,हेमंत राऊळ,संजय सावंत,नितेश केळुसकर,विशाल केळुसकर,पार्थ राऊत,कुशाल साळगावकर,संतोष राणे,राजू कुबल, केशव खोबरेकर,पायाजी साळगावकर,किशोर राऊळ,हेमंत राणे,हेमंत साळगावकर,वैष्णव केळुसकर,रोहित रोगे,परशुराम राऊळ, मंगेश खोबरेकर,मुकुंद कोळंबकर,सदाशिव राऊळ या प्रवेशकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे. याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, जिल्हा प्रवक्ते मंदार केनी, माजी बांधकाम सभापती यतीन खोत,काँग्रेस तालुका प्रमुख जेम्स फर्नांडिस,शहरप्रमुख बाबी जोगी आदि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.