आयजीच्या जीवावर बायजी उदार ; वैभव नाईकांच्या प्रचारपत्रकात महायुतीच्या कामाचे श्रेय घेण्याचा प्रकार
भडगाव धरण आणि वैभव नाईक यांचा काहीही संबंध नाही ; वैभव नाईकांनी दिशाभूल करू नये : योगेश घाडी
कुडाळ : मागील दहा वर्षे निष्क्रिय आमदार असलेल्या वैभव नाईक यांनी आपल्या निवडणूक प्रचारपत्रकात आंगणेवाडी, भडगाव, आंब्रड, घोटगे येथील धरणांच्या कामांना आपल्या प्रयत्नांतून मंजुरी मिळाली व कामांना सुरुवात झाली असा उल्लेख केला आहे. मात्र प्रत्यक्षात या कुठल्याही धरण प्रकल्पांशी आमदार वैभव नाईक यांचा काहीही संबंध नसून महायुती सरकार आणि भाजपा नेत्यांच्या माध्यमातून झालेल्या कामांचे श्रेय घेण्याचे वैभव नाईक यांनी टाळावे, असा सल्ला भाजपा कार्यकर्ते योगेश घाडी यांनी प्रसिद्धिपत्रकातून दिला आहे.
भडगाव धरणाच्या संदर्भात सण १९९७ पासुन स्थानिक ग्रामस्थ स्वतः पाठपुरावा करत आहेत. सण १९९८ साली सुरेश प्रभू खासदार असताना पहिल्यांदा या धरणाचा स्थळ पाहणी अहवाल शासनाला सादर झाला. तर सन २००६ साली नारायणराव राणे पालकमंत्री असतेवेळी या धरणासाठी माती परीक्षण झालं. नंतरच्या काळात प्रशासकीय मान्यता होऊनही रखडलेल धरणाचं काम महायुतीच सरकार आल्यानंतर सुरू झाल. त्यामुळे या धरण प्रकल्पाशी आमदार वैभव नाईक यांचा काहीही संबंध नाही. या धरण कामाशी वैभव नाईक यांचा संबंध असेल तर त्यांनी या धरणासाठी काय पत्रव्यवहार केला, हे जाहीर करावे, असे आवाहन योगेश घाडी यांनी केले आहे.
वैभव नाईकांच्या निष्क्रियतेमुळे शेतकऱ्यांची नुकसान भरपाई रखडली !
वैभव नाईक यांच्यासारखा निष्क्रिय आमदार असल्याने येथे काम सुरू होऊन दोन वर्षे झाली आपण अद्याप भूसंपादन होऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. निलेश राणे आमदार झाल्यानंतर शेतकऱ्यांची सर्व प्रलंबित नुकसानभरपाई मिळवून देणार असल्याचेही योगेश घाडी यांनी म्हटले आहे.