गावठी दारू वाहतूक करणारी अल्टो पोलिसांच्या ताब्यात ; पती- पत्नीवर गुन्हा !

मालवण : गोवा बनावटीच्या दारूची अवैध वाहतूक प्रकरणी हडी-कालावल मार्गावर रविवारी रात्री मालवण पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत ३३,६०० किमतीचा अवैध दारूसाठा व अल्टो कार (एमएच ०३ – एआर २१५८) पोलिसांनी जप्त केली आहे. तर या दारू वाहतूक प्रकरणी पती- पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मालवण पोलीस निरीक्षक एस एस ओटवणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सचिन चव्हाण, भारत फारणे, पेडणेकर, पाटील व महिला पोलीस ओरसकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

दरम्यान अल्टो कार मधील योगेश विलास मयेकर व त्याची पत्नी नेहा योगेश मयेकर रा. पोयरे (मसवी) देवगड यांच्यावर मालवण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक एस एस ओटवणेकर यांनी दिली.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!