भव्य प्रवेश सोहळा | दत्ता सामंत असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेत दाखल ; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रवेश
खा. श्रीकांत शिंदे, माजी खा. निलेश राणे, आ. रवींद्र फाटक यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित
मालवण | कुणाल मांजरेकर
भाजप नेते दत्ता सामंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शनिवारी रात्रीच धनुष्यबाण हाती घेतला. त्यांच्या समवेत असंख्य पदाधिकारी कार्यकर्त्यांनी धनुष्यबाण हाती घेत निलेश राणे यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचा निर्धार मुख्यमंत्र्यांच्या समोर केला आहे. या प्रवेशावेळी खा. श्रीकांत शिंदे, माजी खासदार निलेश राणे यांच्यासह शिवसेना नेते आ. रवींद्र फाटक, बाळा चिंदरकर, दीपक वेतकर तसेच शिवसेनेचे अन्य नेते उपस्थित होते. शनिवारी मध्यरात्री हा प्रवेश पार पडला. निलेश राणे यांच्या पाठोपाठ दत्ता सामंत यांच्या शिवसेना प्रवेशाने जिल्ह्यात शिवसेनेला नवीन उभारी मिळणार आहे.
गेले काही दिवस सक्रिय राजकारणातून काहीसे अलिप्त दिसून येत असलेल्या दत्ता सामंत यांनी शनिवारी भाजप नेते खासदार नारायण राणे आणि कुटुंबियांची भेट घेत आपण राणे कुटुंबीय यांच्यासोबत कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत दाखल होण्याचा निर्णय घेतला होता. पक्षप्रवेश करण्यासाठी कार्यकर्त्यांसह ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते. शनिवारी मध्यरात्रीच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते धनुष्यबाण हाती घेतला.
प्रवेशकर्त्यांमध्ये माजी सभापती सुनील घाडीगावकर, अनिल कांदळकर, जेरॉन फर्नांडिस, संतोष साटविलकर, राजेंद्र प्रभुदेसाई, मंदार लुडबे, संतोष कोदे, महेश बागवे, छोटू ठाकूर, दादा नाईक, राजू बिडये, रुपेश पाटकर, डॉ. प्रमोद कोळंबकर, ऋषी पेणकर, दिलीप बिरमोळे, दीपा सावंत, सुयोग मोरजकर, दयानंद प्रभुदेसाई, सचिन पाताडे, रंगनाथ आजगावकर, सुधीर पडेलकर, मुजफ्फर मुजावर, चंद्रकांत (चंदू) कदम, अभिजित सावंत, सलवादर मिरींडा, शाम शेगले, तुषार सामंत, रामचंद्र राउळ, भाउ पोतकर, धोडी नाईक, सचिन बिरमोळे, हेमंत चव्हाण, कमलेश प्रभू, भुपेंद्र गावडे, दत्ता चोपडेकर, भाऊ मोरजे, शानू वालावालकर, उमेश परब, उमेश बिरमोळे, बाळासाहेब माने, सुधीर वस्त, सुशांत घाडीगावकर, बबन परब, मकरंद राणे, संतोष पालव, निलेश बाईत, सौ.सोनाली घाडीगावकर, सौ. संजीवनी लुडबे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.