वैभववाडी तालुक्यात आ. नितेश राणेंचा झंझावात ; उंबर्डे, आखवणे भोम पुनर्वसन गावठण येथील उबाठाचे पदाधिकारी भाजपात

उंबर्डे शाखाप्रमुख रमेश साळवी, आखवणे भोम पुनर्वसन येथील उबाठाचे माजी शाखाप्रमुख सुरेश उर्फ बुवा पांचाळ तसेच असंख्य कार्यकर्ते भाजपात 

वैभववाडी : कणकवली, देवगड व वैभववाडी मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांनी मतदार संघातून उबाठाला खिंडार पाडण्याचे काम सुरूच ठेवले आहे. शनिवारी आ. राणे यांच्या उपस्थितीत उंबर्डेतील उबाठा गटाचे शाखाप्रमुख, ग्रामपंचायतचे माजी सदस्य रमेश साळवी यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. तर आखवणे, भोम पुनर्वसन गावठण येथील उबाठा गटाचे माजी शाखाप्रमुख सुरेश उर्फ बुवा पांचाळ यांनी देखील भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे.सर्व प्रवेश कर्त्यांचे आमदार नितेश राणे यांनी भारतीय जनता पार्टीत स्वागत केले.

उंबर्डे मध्ये भाजपात प्रवेश करणाऱ्यांमध्ये विशाखा सकपाळ, शशिकांत जाधव, जगन्नाथ जाधव, सतीश मोरे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा समावेश आहे. यावेळी जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे, मंडळ अध्यक्ष सुधीर नकाशे, प्रमोद रावराणे, जयेंद्र रावराणे, नासीर काझी, भालचंद्र साठे, अरविंद रावराणे, संजय सावंत, हुसेन लांजेकर, प्राची तावडे, अतुल सरवटे, किशोर दळवी, रोहन रावराणे, वैभवी दळवी, स्वप्नील खानविलकर व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. उंबर्डे गावच्या विकासासाठी आमदार नितेश राणे यांनी भरघोस निधी दिला आहे. यापुढे देखील गावचा विकास आमदार नितेश राणेच करू शकतात, असा विश्वास श्री. साळवी यांनी व्यक्त केला.

आखवणे, भोम पुनर्वसन गावठण येथील उबाठा गटाचे माजी शाखाप्रमुख सुरेश उर्फ बुवा पांचाळ यांनी देखील भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश पार पडला. आमदार नितेश राणे यांनी पांचाळ यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी मंडळ अध्यक्ष सुधीर नकाशे, जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे, प्रमोद रावराणे, नासीर काझी , जयेंद्र रावराणे, भालचंद्र साठे, अरविंद रावराणे, राजा राणे,  हुसेन लांजेकर, प्राची तावडे, संजय सावंत, अतुल सरवटे, रोहन रावराणे, स्वप्नील खानविलकर, उदय पांचाळ, सरपंच आर्या कांबळे, डॉ. जगन्नाथ जामदार, आकाराम नागप, रंगनाथ नागप, अभय कांबळे आदी उपस्थित होते. पुनर्वसन येथे पार पडलेल्या बैठकीत आमदार नितेश राणे यांनी आपण प्रकल्पग्रस्तांच्या कायम सोबत आहोत. प्रकल्पग्रस्तांचे उर्वरित प्रश्न लवकरच मार्गी लावणार असे सांगितले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3836

Leave a Reply

error: Content is protected !!