कुडाळ – मालवण विधानसभा निवडणूक : महायुतीचे उमेदवार निलेश राणे उद्या सकाळी उमेदवारी अर्ज दाखल करणार
मालवण : कुडाळ मालवण विधानसभा महायुतीचे उमेदवार, माजी खासदार निलेश राणे सोमवार दि. २८ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वा. उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी सिंधुदुर्ग रत्नागिरीचे खासदार नारायणराव राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, मंत्री दीपक केसरकर, आमदार नितेश राणे तसेच महायुती घटकपक्षाचे भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपाई जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी, व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
सकाळी १० वाजता कुडाळ तहसीलदार कार्यालय येथे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे निलेश राणे उमेदवारी अर्ज दाखल करतील. तरी महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतक यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपा कुडाळ मंडळ तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर यांनी केले आहे.