शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या धुरीवाडा शाखाप्रमुख पदी गणपत आडिवरेकर यांची नियुक्ती

मालवण : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या धुरीवाडा शाखाप्रमुख पदी गणपत नामदेव आडिवरेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, नेते विनायक राऊत, उपनेते अरुण दुदवडकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर तसेच शहरप्रमुख पृथ्वीराज उर्फ बाबी यांच्या शिफारसीने हि नियुक्ती करण्यात आली आहे. वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार वैभव नाईक यांच्या प्रेरणेने आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची हि जबाबदारी सांभाळणार असल्याचे गणपत आडिवरेकर यांनी सांगितले आहे.

मालवण येथील बैठकीत माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, जिल्हा प्रवक्त्ते मंदार केणी, माजी आमदार परशुराम उर्फ जिजी उपरकर, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, शहरप्रमुख पृथ्वीराज उर्फ बाबी, उपशहरप्रमुख उमेश मांजरेकर,  माजी शहरप्रमुख नंदू गवंडी, माजी नगरसेवक नितीन वाळके, बंडू सरमळकर, जयदेव लोणे तसेच शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक यांच्या उपस्थितीत गणपत आडिवरेकर यांचे अभिनंदन करुन त्यांना पुढील वाटचालीसाठी सदिच्छा देण्यात आल्या.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3836

Leave a Reply

error: Content is protected !!