भाजपा वैद्यकीय आघाडी ग्रामीण भागात आरोग्य सेवकांची नेमणूक करणार
वैद्यकीय आघाडी प्रदेश सहसंयोजकांची माहिती ; मालवणला भेट
कुणाल मांजरेकर
मालवण : भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडीच्या वतीने मालवण तालुक्यात आरोग्य सेवकांची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यांच्या मार्फ़त गरजु रुग्णाना केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून उपलब्ध वैद्यकीय सुविधांची व मदतीची माहिती देण्यात येणार आहे. तसेच मुंबई आणि गोवा येथे जाणाऱ्या गरजु रुग्णांना कशी मदत करता येईल, यासाठी देखील भाजपा प्रयत्न करीत असल्याची माहिती भाजपा वैद्यकीय आघाडीचे प्रदेश सहसंयोजक डॉ. अमेय देसाई यांनी मालवणमध्ये दिली.
डॉ.अमेय देसाई यांनी मालवण येथे भाजपा कार्यालय येथे भेट देऊन पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून आरोग्य विभागात तालुका संयोजक म्हणून प्रकाश मेस्त्री यांची निवड करण्यात आली.यावेळी भाजपा प्रदेश कार्यालय प्रमुख शरद चव्हाण यांच्यासह भाजपा जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, शहर मंडलचे प्रभारी अध्यक्ष विजय केनवडेकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, नगरसेवक दीपक पाटकर, बाबा परब, सौ. पूजा करलकर, महेश मांजरेकर, पंकज पेडणेकर, प्रमोद करलकर, आबा हडकर, बाळू मालवणकर, संतोष गावकर व कार्यकर्ते उपस्थित होते.