अतिवृष्टीने कोकणातील आंबा, काजू पीकाबरोबरच भातशेतीचेही नुकसान

माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी वेधले राज्यपालांचे लक्ष ; केंद्र सरकारच्या वतीने पॅकेज जाहीर करण्यासाठी केंद्रीय कृषीमंत्र्यांशीही चर्चा करणार

मालवण | कुणाल मांजरेकर

कोकणामध्ये नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे व वाऱ्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात भातशेतीही केली जाते. शेतकऱ्याचे मुख्य आर्थिक स्तोत्र त्याच्यावरच अवलंबून असते. भात पीक तयार झालेले असताना सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये पडलेल्या अतिवृष्टीमुळे पूर्णपणे शेती जमीनदोस्त होऊन शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. आंबा व काजू उत्पादन याच्यावरही मोठ्या प्रमाणात या अतिवृष्टीमुळे फरक पडणार आहे. कोकणातील भात शेती उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठे क्षेत्र असल्यामुळे यांना आर्थिक मदत सरकारमार्फत करण्यात यावी नुकसानीचे ताबडतोब पंचनामे करण्यात येऊन सरकार दरबारी याचा अहवाल सादर करण्यात यावा अशी मागणी माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी महाराष्ट्र शासनाचे राज्यपाल यांच्याकडे केली आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाला लहान शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आर्थिक पॅकेज देण्यात यावे, अशी मागणी दिल्ली येथे देशाचे कृषिमंत्री शिवराज चौहान यांची भेट घेऊन करण्यात येणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3836

Leave a Reply

error: Content is protected !!