आजची गर्दी पाहून उद्या दोन्ही राणे विधानसभेत असतील याची खात्री
कुडाळच्या महायुतीच्या मेळाव्यात उद्योगमंत्री उदय सामंत यांचा विश्वास ; सामंत आणि राणे आता थांबणार नाहीत
कुडाळ : कुणाल मांजरेकर
राणेसाहेबांनी कोकणात विकासाची गंगा आणली. त्यांच्याच पाऊलावर पाऊल ठेवून त्यांचे दोन्ही सुपुत्र आज राजकारण आणि समाज कारणात कार्यरत असून आजची गर्दी पाहून दोन्ही राणे उद्या विधानसभेत असतील याची खात्री झाली आहे, असा विश्वास राज्याचे उद्योगमंत्री तथा शिवसेना नेते ना. उदय सामंत यांनी कुडाळ येथील महायुतीच्या मेळाव्यात बोलताना व्यक्त केला.
कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघात आता परिवर्तन होणार आहे, असा विश्वास व्यक्त करून आम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आणली आहे. पण ही योजना बंद करण्यासाठी काँग्रेसचे प्रयत्न सुरु आहेत. याचं काँग्रेसची साथ उद्धव ठाकरे आणि शरद पवार देत असल्याचे ते म्हणाले. राणेंच्या हाताच्या रेषा उलट्या आहेत. ज्यांना ज्यांना ते मदत करतात, ते ऐन निवडणुकीत त्यांना रंग दाखवतात, असे सांगून कोण कुठेही असला तरी राणेना काही फरक पडत नाही, यापुढे सामंत आणि राणे थांबणार नाहीत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.