आपली परंपरा, संस्कृती ही देवतांची देणगी ; ही टिकवणे आपली सर्वांची जबाबदारी
भाजपा नेते निलेश राणे यांचे प्रतिपादन ; श्री देव कुडाळेश्वर मंदिरातील कीर्तन महोत्सवाला भेट
कुडाळ : आपली परंपरा, संस्कृती ही देवतांची देणगी आहे. ही परंपरा टिकवणे आपली सर्वांची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख माजी खासदार निलेश राणे यांनी कुडाळ येथे श्री देव कुडाळेश्वर उत्सव मंडळाने आयोजित केलेल्या श्री देव कुडाळेश्वर कीर्तन महोत्सवाच्या निमित्ताने बोलताना केले. यावेळी त्यांनी श्री देव कुडाळेश्वराचे दर्शन घेतले.
श्री देव कुडाळेश्वर मंदिरामध्ये श्री देव कुडाळेश्वर कीर्तन महोत्सव सुरू आहे. या महोत्सवानिमित्त भाजपचे मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे यांनी दर्शन घेऊन कीर्तन महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशीचे उद्घाटन केले. यावेळी भाजपचे जिल्हा चिटणीस विनायक राणे, उत्सव मंडळाचे अध्यक्ष किशोर काणेकर, भाजप गटनेता विलास कुडाळकर, नगरसेवक अभिषेक गावडे, नगरसेविका चांदणी कांबळी, माजी नगरसेवक राकेश कांदे, सुनील बांदेकर, योगेश राऊळ, राजेश पडते, मंडळाचे महेश कुडाळकर, निलेश कुडाळकर, सुरेश राऊळ, श्रीकृष्ण कुंटे, उदय वेलणकर, चंदन कांबळी, विजय कांबळी आदी उपस्थित होते.