शिवकालीन मोरयाचा धोंडा प्रकाशमान ; आ. वैभव नाईकांच्या माध्यमातून हायमास्ट टॉवर
युवासेना तालुका समन्वयक मंदार ओरसकर, तपस्वी मयेकर यांची माहिती
मालवण : मालवण येथील शिवकालीन श्री क्षेत्र मोरयाचा धोंडा देवस्थान आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून प्रकाशमान झाले आहे. आ. वैभव नाईक यांच्या निधीतून उभारणी झालेला हायमास्ट कार्यान्वित झाला असून यामुळे येथे येणाऱ्या भाविक, मच्छिमार व स्थानिकांची फार मोठी सोय झाली आहे, अशी माहिती युवासेना तालुका समन्वयक मंदार ओरसकर, तपस्वी मयेकर यांनी दिली आहे.
सिंधुदुर्ग किल्ल्यांचे ज्यावेळी बांधकाम सुरू करण्यात आले. त्यावेळी किल्ल्याची पाया भरणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या उपस्थितीत या ठिकाणी झाली. हे ऐतिहासिक धार्मिक ठिकाण आहे. हा परिसर आ. नाईक यांच्या माध्यमातून प्रकाशमान झाला आहे. हे काम मंजूर होण्यासाठी उपशहरप्रमुख संमेश परब, माजी नगरसेविका सेजल परब, माजी नगरसेविका तृप्ती मयेकर यांनी पाठपुरावा केला होता, अशी माहिती मंदार ओरसकर यांनी दिली.