ग्रामीण रुग्णालय पेंडूर कट्टा येथे विकासकामाचे लोकार्पण ; निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती
मालवण : ग्रामीण रुग्णालय पेंडूर कट्टा इमारत येथे भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्यातून खा. नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून उपलब्ध सुमारे 23 लाख निधीतून इमारत शेड बांधकाम करण्यात आले. या कामाचे लोकार्पण भाजपा नेते निलेश राणे यांच्या उपस्थित करण्यात आले.
यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय पोळ तसेच वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांसह भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, जिल्हा बँक संचालक बाबा परब, भाजपा पेंडूर जिल्हापरिषद मतदारसंघ प्रभारी सतीश वाईरकर, सरपंच नेहा परब उपसरपंच सुमित सावंत, श्री देव वेताळ देवस्थान ट्रस्ट सचिव अमित कुलकर्णी, मामा माडिये आप्पा सावंत, पटेल जिप माजी वित्त व बांधकाम सभापती संतोष साठविलकर, शक्ती केंद्र प्रमुख राजन माणगावकर, दीपा सावंत, दाजी सावंत, माजी सभापती अजिंक्य पाताडे, मनसे जिल्हा उपाध्यक्ष गणेश वाईरकर, चेतन मुसळे, अश्विनी पेडणेकर, शेखर फोंडेकर, साबाजी सावंत, सतीश पाटील, बिपिन परब, शामकांत आवळेगावकर, दिलीप परब, संदेश नाईक, उत्तम गावकर, प्रमोद सावंत, गजानन सावंत, बंड्या माडीये, अमित सावंत, सुरेंद्र जबडे, पिंटू वालावलकर, बाळा गावडे, बाबली गावडे, विपुल माळगावकर, नीरज गुराम, स्वप्नील सावंत, न्हानु पेंडूरकर तसेच इतर ग्रामस्थ पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
स्लॅब मधून पावसाळ्यात होणारी गळती दूर होणार आहे. याबाबत समाधान व्यक्त करण्यात आले. सोबतच रुग्णालय तसेच परिसरात आरोग्य सुविधा अनुषंघाने काही आवश्यक मागण्या डॉ. संजय पोळ व उपस्थित वैद्यकीय अधिकारी यांच्या वतीने मांडण्यात आल्या. लवकरात लवकर सर्व मागण्या पुर्ण केल्या जातील. कर्मचारी सुरक्षा रक्षक यांच्याशी ही निलेश राणे यांनी संवाद साधला. काही असेल तर हक्काने सांगा. आपण सोबत आहोत हा विश्वासही कर्मचाऱ्यांना दिला. पेंडूर कट्टा रुग्णालयात डॉक्टर कर्मचारी यांच्या माध्यमातून चांगली सेवा दिली जाते. असे यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी सांगितले. तसेच काही आवश्यक मागण्या आहेत त्या लवकर पुर्ण झाल्यास रुग्णांना अधिक सेवा देणे सुलभ होईल असे सांगण्यात आले. आपण वरिष्ठ अधिकारी यांच्याशी बोलून एक स्वतंत्र बैठक बोलावू असेही निलेश राणे यांनी सांगितले.