दहा वर्षात कुडाळ – मालवणच्या आमदाराकडून विकास कामांची केवळ पत्रेच ; विकास नाहीच
भाजपा नेते निलेश राणे यांचा टोला ; मतदार संघांच्या गतिमान विकासासाठी कटीबद्ध
पेंडूर मोगरणे येथे निलेश राणेंचा ग्रामस्थांशी संवाद ; निधी उपलब्धते बाबत पेंडूर मोगरणे बोराळवाडी ग्रामस्थांनी मानले आभार
मालवण : कुडाळ मालवण मतदार संघ मागील दहा वर्षात मागे पडला आहे. निधी खेचून आणण्याची क्षमता नसल्याने केवळ पत्रे देण्याचे काम येथील आमदाराने केले. परंतु, कोणी काय केले यापेक्षा या मतदार संघाच्या गतिमान विकासासाठी आपण कटीबद्ध आहोत. शासनाच्या माध्यमातून मोठा विकासनिधी सातत्याने उपलब्ध केला जाईल. ग्रामस्थांच्या मागणी नुसार विकासकामाला प्राधान्य असेल, अशी ग्वाही भाजपाचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख, माजी खासदार निलेश राणे यांनी पेंडूर येथे ग्रामस्थांशी संवाद साधताना दिली.
पेंडूर मोगरणे बोराळवाडी ते कारणेवाडी गुरामवाडी ग्रामा 386 रस्ता पंतप्रधान सडक योजनेतून होण्यासाठी खासदार नारायण राणे यांचे पत्र भाजपा नेते निलेश राणे यांनी ग्रामस्थांना दिले. तसेच राणे साहेबांच्या खासदार निधीमधून येथील विकासकामांना आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. वाडीतील पाणी व अन्य समस्या जाणून घेत लवकरच त्या सोडविण्यासाठी आवश्यक निधी तसेच अधिकारी वर्गाशी बोलणी करून मार्ग देखील काढण्यात येईल, असा शब्द देखील निलेश राणे यांनी ग्रामस्थांना दिला.
राज्यात मागील दोन वर्षात विकासाची गंगा वाहत आहे. शिंदे फडणवीस सरकारच्या माध्यमातून मोठया प्रमाणात विकासनिधी उपलब्ध होत आहेत. रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपले हक्काचे खासदार नारायण राणे असल्याने केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त विकासनिधी मालवण कुडाळ मतदार संघातील वाडीवस्तीवर उपलब्ध होत आहे. ग्रामस्थांना अपेक्षित विकास 100 टक्के साध्य करण्यासाठी कटीबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
आमच्या मागणीनुसार निलेश राणे यांनी विकासनिधी उपलब्धता केली आहे. आणखीही निधी उपलब्ध करण्याचा दिलेला शब्द ते पुर्ण करणार हा आमचा विश्वास आहे. वाडीतील रखडलेली विकासकामे गतिमानरित्या पुर्ण होतील असे सांगत ग्रामस्थांनी निलेश राणे यांचे आभार मानत श्री देव वाडवळी महापुरुष मंदिर येथे त्यांचा सत्कार केला.
यावेळी जिल्हा बँक संचालक बाबा परब, सरपंच नेहा परब, उपसरपंच सुमित सावंत, मामा माडये, आप्पा सावंत पटेल, जिल्हा परिषद प्रभारी सतीश वाईरकर, जिल्हा परिषद माजी बांधकाम सभापती संतोष साटविलकर, राजन माणगावकर, दीपा सावंत, शेखर फोंडेकर, साबाजी सावंत, सतीश पाटील, बिपिन परब, पंढरीनाथ काटकर, अमित सावंत, बंड्या माडीये, सुरेंद्र जबडे, बाळा वराडकर, रमेश वराडकर तसेच अशोक काटकर, आबा काटकर, संतोष चव्हाण, निरज माडये, शोभा सरमळकर, महेश काटकर, दिनेश काटकर, बाळा वराडकर, रमेश वराडकर, विश्वनाथ सरमळकर, भिकाजी सरमळकर, सुबोध सरमळकर, शारदा काटकर, सुरेखा चव्हाण, शोभा सरमळकर, वर्षा काटकर, सविता काटकर, रूपाली वराडकर, नम्रता सरमळकर, शिल्पा सरमळकर, शुभांगी सरमळकर, संगीता काटकर, सत्यवती काटकर, अर्चना काटकर, नूतन वराडकर यांसह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.