वैभव नाईक बहुमताने निवडून येऊन पालकमंत्री होऊंदेत ; सुकळवाडच्या भवानी मातेला साकडे

आ. नाईक यांनी घेतले सुकळवाड पाताडेवाडी येथील श्रीदेवी भवानी मातेचे दर्शन ; पाताडेवाडीच्यावतीने सत्कार

श्रीदेवी भवानी मातेच्या सभामंडपासाठी आ. वैभव नाईकांच्या माध्यमातून १५ लाखांचा निधी प्राप्त 

मालवण : मालवण कुडाळ मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांनी सुकळवाड येथील श्री भवानी मातेचे दर्शन घेतले. यावेळी पाताडेवाडी उत्कर्ष मंडळ यांच्या वतीने ढोल ताशाच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी भवानी मातेचे मानकरी व सुकळवाड विभागाचे निष्ठावंत कार्यकर्ते सुनील पाताडे यांनी वैभव नाईक बहुमतानी निवडुन येऊन पालकमंत्री होऊदे असे गाऱ्हाणे घालत पाताडेवाडी आपल्या पाठीशी ठामपणे उभी आहे, असा शब्द दिला. 

आमदार वैभव नाईक यांनी मंदिराच्या सभागृहासाठी १५ लाख रुपयांचा निधी प्राप्त करून दिला. त्याबद्दल श्रीदेवी भवानी जिर्णोद्धार समिती अध्यक्ष भाऊ पाताडे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख पंकज वर्दम, ग्रामपंचायत सदस्य नरेंद्र पाताडे, मंडळाचे उपाध्यक्ष शरद पाताडे उपस्थित होते. मंडळाचे सचिव चंद्रसेन पाताडे यांनी सूत्रसंचालन तर सुनील पाताडे यांनी प्रास्ताविक केले. 

आमदार वैभव नाईक यांनी श्रीदेवी भवानी मंदिर पूर्ण होईपर्यंत लागेल ती मदत करण्याचे आश्वासन दिले. यावेळी दीपक पाताडे, रुपेश गरुड, सुयोग धामापूरकर, ग्रा. प. सदस्य अविनाश गरुड, मंडळाचे कार्यकर्ते इंद्रजीत पाताडे, हेमदीप पाताडे, शांताराम पाताडे, नागेश पाताडे, विजय पाताडे, प्रकाश काळसेकर, ललित पाताडे, नितीन पाताडे, मनोहर पाताडे, सुदर्शन पाताडे, सुयोग पाताडे, हेमंत कुमार पाताडे, समीर धामापूरकर, प्रसाद पाताडे, अशोक पाताडे, अनिल पाताडे, प्रदीप पाताडे, उमेश पाताडे, दिलीप पाताडे, नारायण पाताडे, किरण पाताडे, चंद्रशेखर पाताडे, मंगेश पाताडे, महिला मंडळ अध्यक्ष सौ. काजल पाताडे, महिला मंडळ सचिव सौ. दिपाली धामापूरकर, मंडळ सदस्य सौ.मंजिरी पाताडे, सौ. सुस्मिता पाताडे यांच्यासह अनेक महिला व पाताडेवाडीतील शिवसैनिक उपस्थित होते. मंडळाचे सचिव चंद्रसेन पाताडे यांनी आभार मानले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3607

Leave a Reply

error: Content is protected !!