यतीन खोतांची शब्दपूर्ती ; फोवकांडा पिंपळ ते मोंडकर घराकडील खड्डेमय रस्त्याची दुरुस्ती

मालवण : शहरातील फोवकांडा पिंपळ ते मोंडकर घराकडील रस्ता नादुरुस्त बनल्याने या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत होती. या रस्त्याचे दसऱ्यापूर्वी काँक्रीटीकरण करून देण्याचा शब्द माजी बांधकाम सभापती यतीन खोत यांनी दिला होता. त्यानुसार जिल्हा नियोजन निधीतून हे काम पूर्ण करून दसऱ्यापूर्वी हा रस्ता वाहतुकीला खुला करण्यात आला आहे. याबद्दल येथील नागरिकांनी यतीन खोत यांचे आभार मानले आहेत. तर आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून या कामासाठी निधी उपलब्ध झाल्याबद्दल श्री. खोत यांनी आ. नाईक यांचे आभार मानले आहेत.


Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3607

Leave a Reply

error: Content is protected !!